न्यूनगंड

मी मुकुंद रामकृष्ण पाटील उपाख्य बाबा पाटील अमरावती जिल्ह्याच्या दुर्गम अशा मेळघाट भागातील धारणी तालुक्याचा रहिवासी आहे. . आपल्यासमोर मी माझी ही पहिली कादंबरी न्यूनगंड सादर करत आहे. तशी ही कादंबरी एक मर्डर मिस्ट्री आहे.या कथेतील नायक न्यूनगंडाने पछाडलेला असतो. कधीकाळी त्याच्या मनात खोलवर रुतलेला हा न्यूनगंड त्याला प्रत्येक कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यालाहे कळत असते पण त्याचा नाइलाज असतो. इतर वेळेस तो अगदी नॉर्मल असतो पण एखाद्या विशिष्ट प्रसंगी तो अगदी हवालदिल होतो. तो एक वकील असतो नुकतीच वकिली पास करून त्याने ज्युनियर म्हणून नामांकित वकिलाच्या हाताखाली प्रॅक्टिस सुरू केली होती. तो जात्याच चाणाक्ष आणि हुशार होता. आणि त्याचे ते गुणच त्याला कुठे टिकू देत नव्हते. ही नवागंतुक आणि प्रस्थापित यांच्यातील अघोषित लढाई होती. तशातच त्याला एका मर्डर केस मध्ये कोर्टाकडून आरोपीचा वकील नियुक्त केल्या जाते. अकस्मात आलेल्या या जबाबदारीने तो पूर्ण गोंधळून जातो आणि त्याचा न्यूनगंड उफाळून येतो. आपल्याला मिळालेल्या संधीच सोन करावं आणि स्थापित व्हावं या उद्देशाने तो आपल्या न्यूनगंडासह त्या केस वर काम करतो आणि एका प्रस्थापित आणि नामांकित सरकारी वकिलांच्या विरोधात तिथे जिंकतो. एखाद्या डिटेक्टिव्ह सारखं काम करून तो त्या केसचा तपास करतो आणि त्यात सफल होतो. . !!! इति शुभम!!! बाबा पाटील

399.00